ब्लॉग शोधा

शनिवार, २१ मे, २०२२

हाय होल्टेजच्या तारेखाली

हाय होल्टेजच्या तारेखाली
उभी राहतात घरं
ज्यांच्या एकत्रित अस्तित्वाला
झोपडपट्टी म्हटलं जातं.
हाय होल्टेजच्या तारांमधून
सणसण सणसण वाहत असतो उजेड
अवघ्या जगासाठी.
त्याखाली भणभण माशांच्या गोतावळ्यात
थाटलेले असतात संसार.
झेड सेकुरिटीत वाहत असतात 
धरण वाहून नेणारे पाईप
याच झोपडपट्टीखालून 
पण तहान भागवावी विश्वासाने 
नसतो एवढाही नळ कुठे.
गटार मात्र खुलीच असते हवी तशी.
हाय होल्टेजची भीती एवढी की
मस्त आकाशाकडे हात उभारून
उभं राहता येत नाही झोपडीवर.
तोंडात उणउण पाणी घेऊन
घडघड टाकता येत नाही चूड
मान उंचावून वगैरे.
एवढ्याशा लाईटासाठी
एखादी बेकायदा तार टाकता येत नाही
हाय होल्टेजच्या तारांवर.
लक्ष देऊन ,भूत बनून
कमरेवर हात देऊन उभा असतो
हाय होल्टेजचा खांब
अगदी विठ्ठलासारखा.
खूपदा कळत नाही
हाय होल्टेजच्या तारांमधून
वाहणारी ऊर्जा येते कुठून?
आणि त्याखाली राहणारी लोकं
एवढी सुकत का जाताहेत?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट