ब्लॉग शोधा

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१८

खेळणी

 खेळणी

वारीच्या गर्दीत
बापाने खांद्यावर घेतलं मुलाला
वासुदेवाने नदी लोट्ल्यासारखी
त्याने सारली हिम्मतीने गर्दी
आणि ठेवले  तुकारामाच्या पालखीवर हात .
फिरवले मुलाच्या तोंडावरूनही.
मुलगा त्याच्या तालात गुंग
वारकरी त्यांच्या तालात गुंग .
पुन्हा आपली गर्दी सारून
बाप आला आपला मागे
मुलाला खांद्यावर घेवूनच .
आणि थांबला एका खेळण्याच्या दुकानासमोर
मुलासाठी .मुलाच्या आनंदासाठी .
मुलगा म्हणाला ,बाबा ही  खेळणी नको
मला बंदूक पाहिजे .
नाहीतर  चमकणारी तलवार द्या .
बाप म्हणाला नको ,नको
ही शिट्टी घे ,फुगा घे.
मुलगा म्हणाला नाही .
मला बंदुकच पाहिजे नाहीतर तलवार
नाहीतर हा भुताचा मास्क द्या.
बाप बघत राहिला मागे वळून  
तुकारामाची पालखी गर्दीत दिसेनाशी होत होती.

जर जग बदलायचे असेल तर

प्रेम करा तिच्यावर .तिच्यावरच .
जर जग बदलायचे असेल तर .
करा प्रेम आणि जपा तिला

जपा तिला हे समजून की
ती आहे पावित्र्याचे अंतिम पात्र.(थाळी )
करा तिच्यावर प्रेम त्यागाच्या भावनेपलीकडेही
जो त्याग ती जगत आलीय
अखिल मानवतेसाठी.

ना.ही जखम तिच्या एकटीने बरी होणारी नाही .
ना.ती सहअस्तित्वातही कमजोर नाही.

जर जग बदलायचे असेल तर
प्रेम करा तिच्यावर .सर्व दिशांनी ,सर्व मार्गांनी .
जोपर्यंत ती ठेवत नाही विश्वास तुमच्यावर
जोपर्यंत तिची सहजता ,तिची स्वप्ने ,तिचा आवाज
तिच्या कला ,तिचं वेड,तिची स्वैर उनाडता तिला परत मिळत नाही .
जोपर्यंत ती होत नाही प्रेमाची अद्भुत शक्ती .
जगाच्या राक्षसी प्रेक्षनाने तिला केलंय विचलित
नष्ट केलीय तिची मूल्यता
त्यातुलनेत करा तिच्यावर प्रेम अधिक
जर जग बदलायचे असेल तर .

जर जग बदलायचे असेल तर
सोडा तुमची कारणं,ठेवा हत्यारं खाली
मोडा धाकाची धुडं ,संपवा अंत्यस्थ युद्धाला
दूर ठेवा तथाकथित सात्विक संताप
आणि करा प्रेम तिच्यावर
भव्यतांसाठीच्या प्रयत्नांपलीकडेही,
ज्ञानासाठीच्या दीर्घशोधांच्या चिकाटीपलीकडेही
आपल्या पुढ्यात आहे पावित्र्याचा अंतिम पेला.
तिला घ्या केवळ बाहुपाशात
आणि हाती येईल आत्मियतेच्या पलीकडचे काही .

जर जग बदलायचे असेल तर
प्रेम करा तिच्यावर .
करा प्रेम सावलीच्या खोलीपर्यंत
आपल्या अस्तित्वाच्या मुलभूत सर्वोच्चतेपर्यंत .
आणि भेटा तिला त्याच बागेत
ज्या बागेत पहिल्यांदा भेटला होतात .
आणि प्रकाशाचे बिंदू बिंदू होऊन
चाला इंद्रधनुष्याचा तोच पथ
जिथून पुन्हा परतण्याचा मार्ग नाही
नव्या जगाच्या निर्मितीसाठी .
Lisa Ci tore
अनुवाद डॉ. जगतानंद भटकर.

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट