ब्लॉग शोधा

शनिवार, २७ जानेवारी, २०१८

पूल


पूल

गावानं कुस पालटल्या पालटल्या
पुलावरून जायची मीनाक्षी एक्सप्रेस.
नदीवरचा भला मोठा पूल धडधडायचा
पुलाचं धडधडनं भरून राहायचं मनात.
पूल मजबूत कित्येक वर्षांपासून
पुलाचा बीम अन बीम आखीव,कातीव,रेखीव.

आबाजी सांगायचे या बीमाच्या गोष्टी  
वरच्या ,आतल्या ,खालच्या मजबुतीबद्दल.
बीमाला यावी मजबुती म्हणून सांगायचे
गाडली जायची माणसं बीमांच्या पायांमध्ये
दरिद्री ,परप्रांतीय ,अडाणी ,अनभिज्ञ,निष्पाप
हातावर पोट भरणारी अशी माणसं
ठरवूनच गाडली जायची योजना आखून.
अनुभव होता म्हणे त्या कंत्राटदारांचा की ,
माणसं गाडली की मजबुती येते बीमांना.
आबाजी खोटं बोलायचे पण खरं सांगायचे .
धडधडतचं राहायचा पूल मग आणखी
रात्री बेरात्री दिवसा उजेडी कधीही मनात .

आताशा दिवसा उजेडी कुस पालटतो
आणि हाती येणाऱ्या वर्तमानपत्रातून
धडधडून येते संसद आखीव,रेखीव बीमांसह.
मग हळूचं मुलीकडे बघतो आणि
जूटवू लागतो ताकद सारं काही खरं बोलण्याची.

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

खरंच किती बरं वाटतं

खरंच किती बरं वाटतं
आपल कुणी असलं की
स्वर्ग दोन बोटंच उरतो
गालात कुणी हसलं की

जीव आपला वारा होतो
तुटलेला तारा होतो
समोरच्या गर्दी मध्ये
आपलं कुणी दिसलं की

आजुबाजुचे लोक तसे
आपले कुणीही नसतात
आपण जगाला विसरून जातो
जवळ कुणी बसलं की

कोण कुठली द्वारका ती
आपण तिला ओळखत नाही
का ळजाच्या जागेवरती
गाव प्रेमाचं वसलं की

खरंच किती बरं वाटतं
आपल कुणी असलं की
स्वर्ग दोन बोटंच उरतो
गालात कुणी हसलं की

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट