त्या त्या युगाची
ती ती ओळख असते
असते प्रत्येक युगाची
एक मागणीसुद्धा
ज्ञानेश्वरांनी ज्ञान मागितले
तुकोबांनी देव मागितला
शिवाजीने स्वराज्य मागितले
गांधीनी स्वातंत्र मागितले
आंबेडकरांनी समता मागितली
तुकडोजींनी माणूस मागितला
या युगाचे युगंधर आम्ही
मागतो आहोत चाकरी
कुटकाभर भाकरी!
ती ती ओळख असते
असते प्रत्येक युगाची
एक मागणीसुद्धा
ज्ञानेश्वरांनी ज्ञान मागितले
तुकोबांनी देव मागितला
शिवाजीने स्वराज्य मागितले
गांधीनी स्वातंत्र मागितले
आंबेडकरांनी समता मागितली
तुकडोजींनी माणूस मागितला
या युगाचे युगंधर आम्ही
मागतो आहोत चाकरी
कुटकाभर भाकरी!