ब्लॉग शोधा

शनिवार, २१ मे, २०२२

गाढवाची कविता

आई निवडली नाही
बाप निवडला नाही
जात निवडली नाही
धर्म निवडला नाही
आणि गाढव ठरलो.
आजीला केला नाही आग्रह
विशिष्ट गोष्ट सांगण्याचा
बापाच्ं बोटं धरून गेलो
बाप नेईल त्याच मिरवणुकीत
आईनं बसवलं त्याच दगडासमोर
बसलो हात जोडून ,मांडी घालून
आणि गाढव ठरलो.
शाळेत नेमाने गेलो
अभ्यास केला, कॉपी केली नाही
चांगल्या मार्कांनी पास झालो
आणि गाढव ठरलो.
नोकरी मिळविली पोटापुरती
जोडले नाहीत कुणापुढे हात
झिजवले नाही कुणाचे उंबरठे
धुतली नाहीत
संस्थाचालकांची भंगदरी ढुंगणं,
विकलं नाही शेत
ठेवलं नाही गहाण स्वतःला
आणि गाढव ठरलो.
केलं प्रेम शक्य झालं तेवढं
केलं लग्न तिच्याशीच
जिच्यावर प्रेम केलं
घेतला नाही हुंडा,
जुळविली नाहीत प्रॉपर्टीची गणितं
आणि गाढव ठरलो.
गाढव ठरण्याची ही प्रक्रिया
होत राहिली वारंवार
घेतली नाही लक्षात वेळोवेळी
आणि गाढवं ठरलो
आणि गाढव ठरतोय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी विश्वकोश

पांडुरंग नंदराम भटकर : मुकनायक वृत्तपत्राचे पहिले संपादक

पांडुरंग नंदराम भटकर : बाबासाहेबांचे समविचारी सहकारी डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे आज अवघ्या विश्वाला प्रेरक असणारं आणि मान्य असणारं व्यक्तिमत्...

लोकप्रिय पोस्ट