झाड तसं सूर्यक्षेपी .
आभाळातून ओसंडणारा उजेड
हाती यावा म्हणून झाड झालंय
कधी ताड-माड.
थोपवता यावेत वादळाचे थपेडे म्हणून
झाडाने केलाय पारंब्यांचा घरोबा .
झाडाने दिली सावलीला खोली .
सोसलं ओकेबोकेपण
उद्याच्या हिरवाईसाठी .
दिला आकार सतत विस्तारणारा.
उन पाऊस टिपला पानापानात .
कळू दिलं नाही या पानाचं त्या पानाला.
झाडाने पाखरांसाठी ठेवले क्षितीज मुक्त .
काळ्या कभिन्न अवकाशातून
झाड जोपासत राहले सप्तरंग .
झाड झंकारत राहलं निरिच्छेनं
करुणेच्या, मायेच्या ताडस्वरांनी .
आता एकाएक झाड उपटून ,तटतटून,
मुळासकट रीप्लांट केलं जातंय
फ्लटच्या फरशीमध्ये .
पालिकेच्या नोकराने
हातगाडीवर टाकावा शून्य भावनेने
एखादा मृतदेह कधी
तसं एखादं झाड पडलेलं असतं
एखाद्या प्लॅटफॉर्मवर.
झाड बघते बसच्या ,ट्रेनच्या खिडकीतून .
झाडाला दिसतात माणसं पळताना .
आणि माणसं पळताहेत
हा झाडाचा नसतो भ्रम .
आणि ठरवूनही झाडाला पळता येत नाही
हे सत्य असतं झाडाला समजलेलं.
पालिकेच्या नोकराने
हातगाडीवर टाकावा शून्य भावनेने
एखादा मृतदेह कधी
तसं एखादं झाड पडलेलं असतं
एखाद्या प्लॅटफॉर्मवर.
अलीकडे झाडाला खेटत नाही
थरथरत्या अंगानं एखादी कबरी गाय .
झाडाच्या सावलीखाली आता
उमटत नाहीत स्वर .
कुणी लोंबकळत नाही ,
खेळत नाही डाबडूबली
झाडाच्या अंगावर .
ट्युशनचा ,गाण्याचा ,डान्सचा
क्लास करणारी फुलपाखरं
गडप होतात त्यांच्या रंगांसह
हाय डेफीनेशनच्या चौकटीत.
झाडाचा आणि मातीचा झाडाचा आणि आभाळाचा
तोडला गेलाय संबंध बेदरकार.
आणि झाडाच्या पुढ्यात उरविली गेली
पिवळे पडण्याची अनिवार्यता.
झाड उभं असतं आता खिडकीशेजारी
एखाद्या कैद्याने गजाआड उभे असावे तसे.
खुपदा झाडाला गुंडाळून असते एखादी वेल
आणि वेलीविषयी काही बोलता येत नाही
बोलणं शक्यही नाही.
आभाळातून ओसंडणारा उजेड
हाती यावा म्हणून झाड झालंय
कधी ताड-माड.
थोपवता यावेत वादळाचे थपेडे म्हणून
झाडाने केलाय पारंब्यांचा घरोबा .
झाडाने दिली सावलीला खोली .
सोसलं ओकेबोकेपण
उद्याच्या हिरवाईसाठी .
दिला आकार सतत विस्तारणारा.
उन पाऊस टिपला पानापानात .
कळू दिलं नाही या पानाचं त्या पानाला.
झाडाने पाखरांसाठी ठेवले क्षितीज मुक्त .
काळ्या कभिन्न अवकाशातून
झाड जोपासत राहले सप्तरंग .
झाड झंकारत राहलं निरिच्छेनं
करुणेच्या, मायेच्या ताडस्वरांनी .
आता एकाएक झाड उपटून ,तटतटून,
मुळासकट रीप्लांट केलं जातंय
फ्लटच्या फरशीमध्ये .
पालिकेच्या नोकराने
हातगाडीवर टाकावा शून्य भावनेने
एखादा मृतदेह कधी
तसं एखादं झाड पडलेलं असतं
एखाद्या प्लॅटफॉर्मवर.
झाड बघते बसच्या ,ट्रेनच्या खिडकीतून .
झाडाला दिसतात माणसं पळताना .
आणि माणसं पळताहेत
हा झाडाचा नसतो भ्रम .
आणि ठरवूनही झाडाला पळता येत नाही
हे सत्य असतं झाडाला समजलेलं.
पालिकेच्या नोकराने
हातगाडीवर टाकावा शून्य भावनेने
एखादा मृतदेह कधी
तसं एखादं झाड पडलेलं असतं
एखाद्या प्लॅटफॉर्मवर.
अलीकडे झाडाला खेटत नाही
थरथरत्या अंगानं एखादी कबरी गाय .
झाडाच्या सावलीखाली आता
उमटत नाहीत स्वर .
कुणी लोंबकळत नाही ,
खेळत नाही डाबडूबली
झाडाच्या अंगावर .
ट्युशनचा ,गाण्याचा ,डान्सचा
क्लास करणारी फुलपाखरं
गडप होतात त्यांच्या रंगांसह
हाय डेफीनेशनच्या चौकटीत.
झाडाचा आणि मातीचा झाडाचा आणि आभाळाचा
तोडला गेलाय संबंध बेदरकार.
आणि झाडाच्या पुढ्यात उरविली गेली
पिवळे पडण्याची अनिवार्यता.
झाड उभं असतं आता खिडकीशेजारी
एखाद्या कैद्याने गजाआड उभे असावे तसे.
खुपदा झाडाला गुंडाळून असते एखादी वेल
आणि वेलीविषयी काही बोलता येत नाही
बोलणं शक्यही नाही.